धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात युवा सेना व शिवसेना पक्षवाढीसाठी औश्यापासून बार्शीपर्यंत परिश्रम घेत कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणारे युवा नेते  आनंद पाटील यांची युवा सेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पाटील यांच्यावर धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, राज्याचे सचिव किरण साळी, मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी आनंद पाटील यांची निवड करून शुभेच्छा दिल्या. 

युवा नेते आनंद पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच युवा सेनेच्या वाढीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, औसा, उमरगा, लोहारा, बार्शी आणि तुळजापूर तालुक्यात प्रभावी काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे युवा सेना व शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून स्वागत केले जात आहे.

 
Top