धाराशिव (प्रतिनिधी)- अभिजीत पांडुरंग कुलकर्णी दिनांक 30 जून 2025 रोजी 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर, केंद्र सरकारच्या अणू ऊर्जा खात्याच्या न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन मधून सहयोगी निदेशक यापदावरून सेवानिवृत्त झाले.
कुलकर्णी हे मूळचे धाराशिवचे रहिवासी असून त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण धाराशिव शहरांमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल मधे झाले. उच्च माध्यमीक शिक्षण रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामधून झाले. इंजिनीरिंगची पदवी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून 1987 साली घेतली. 1988 साली भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे ट्रेनि इंजिनियर म्हणून त्यांची निवड झाली. एक वर्षाचे प्रशिक्षण यांनी राजस्थान अणू शक्ती केंद्रात पूर्ण केले. त्यानंतर 1989 मधे त्यांची नियुक्ती तारापूर अणू शक्ती केंद्र 1 आणि 2 मधे वैज्ञानिक अधिकारी -सी म्हणून झाली. तेव्हापासून 2022 पर्यंत त्यांनी तारापूर अणू शक्ती केंद्र 1 ते 4 मधे विविध पदावर काम केले. 2018 पासून ते गुणवत्ता अधीक्षक तारापूर महाराष्ट्र या पदावर कार्यरत होते. 2022 मधे त्यांची बदली पुण्याच्या गुणवत्ता अधिक्षक कार्यालयात झाली. 2023 पासून सेवानिवृत्त होईपर्यंत ते पुणे कार्यालयाचे प्रमुख होते.