तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन राज्याच्या जनतेसाठी सुख, समृद्धी व कल्याण यासाठी प्रार्थना केली. देवीच्या दर्शनासाठी ते खास तुळजापूरात दाखल झाले होते.
मंदिर संस्थानच्या वतीने मंत्री फुंडकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, गुलचंद व्यवहारे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, अभिजित तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, दीपक शेळके तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.