तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांच्या पुढाकाराने रेशीम शेतीला आधुनिकतेची जोड दिली जात असून, शेतकऱ्यांसाठी ही उत्पन्नाचा नवा आणि शाश्वत मार्ग ठरत आहे. बारुळ येथील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावुन भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी हातात कासरा धरुन रेशीम शेतीची स्वतः मशागत केली. 

या जिल्हाधिकारी यांच्या कृतीने शेतकरी आश्चर्य चकीत झाले. अधिकारी वर्ग शेतात उतरण्यास कचरत असतो. येथे तर चक्क  जिल्हाधिकारी यांनी शेतात चक्क कासरा हातात धरुन शेतीची मशागत केली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप मशागतीचे काम, तुती लागवड, रेशीम किड्यांचे संगोपन आणि कोष विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीसोबतच शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत आणि त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, रमेश खताळ,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, माजी सरपंच शहाजी सुपनार उपसरपंच भास्कर सगट, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, तलाठी गोरोबा तोडकरी, ग्रामसेवक प्रशांत भोसले आर.ए.गावडे, ए. एन जगदाळे, पी. एम.काक्रमकर, सिद्राम वटेट, प्रभाकर धनवडे, खंडू कोळी, रमेश खताळ, भगवान नाझरेकर, सुरेश वटेट, कोतवाल भीमाशंकर नवगिरे, रोजगार सेवक शिवराम होर्टे आदी शेतकरी उपस्थित होते.


रेशीम शेतीचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. यास कमी पाण्याची आवश्यकता असते. यातुन शाश्वत रोजगार उपलब्ध होतो. शेतीला पूरक व्यवसाय व्यवसाय आहे. विशेष म्हणून परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे.


 
Top