तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मंगरुळ शिवारातील पिके पावसा अभावी माना टाकत आहेत. हे कमी काय म्हणून पाऊस पडत नसल्याने सोयाबीन, उदडी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे . या बदलत्या नैसर्गिक चक्रामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात सर्वाधीक खरीप पेरणी झाली आहे. खरीपातील सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांचे वषभरांचे अर्थकरण अवलंबून असते. सध्या हलक्या रानातील पिके माना टाकत असुन भारी जमीनीतील पिके काही  दिवस तग धरण्याची शक्यता आहे.

 
Top