तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात 87 जागांचे सर्वेक्षण ठरले  होते, प्रत्यक्ष मोक्यावर  जागा अधिक आढळल्याने एकूण 96 मालमत्तांचा समावेश करण्यात आले.

या सर्वेक्षणासाठी 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सर्वेक्षण प्रक्रियेत संपूर्ण व्हिडिओ ग्राफी करण्यात आली. सर्व संबंधित मालक, भोगवटादार, धारक यांची सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यात आली.


सर्वेक्षणाचा तपशील:

96 मालमत्तांचे सर्वेक्षण, 5 पथकांमार्फत सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण, संपूर्ण व्हिडिओ ग्राफी, सर्व संबंधितांची माहिती संकलित, व्हिडिओ ग्राफीमुळे सर्वेक्षण प्रक्रियेला विश्वसनीयता, पारदर्शकता येते. सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्याचा व्हिडिओ रेकॉर्ड असल्याने कोणतीही शंका किंवा गैरसमज टाळता येतात. हे रेकॉर्ड भविष्यातील पडताळणीसाठी उपयुक्त ठरते.  संपूर्णता आणि अचूकता: प्रत्यक्ष जागेवर काय स्थिती आहे, कोणत्या अडचणी आल्या, सर्वेक्षण कसे पार पडले याचे अचूक दस्तऐवजीकरण होते. जे नंतरच्या नियोजनात मदत करते. 


कार्यालयीन यादी प्रमाणे 87, प्राप्त फॉर्म 81, अपाप्त फॉर्म 6, नव्याने समाविष्ट 15 असे  एकूण प्राप्त फॉर्म  81+15-96,  सशर्त  संमती पत्र प्राप्त 18.

 
Top