तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  श्री तुळजाभवानी मंदीरातील धार्मिक लिपीक पदावरून विश्वास परमेश्वर कदम हे 38 वर्षांच्या सेवेनंतर सोमवार दि. 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आणि त्यांच्या सेवेला गौरव देण्यासाठी सपत्नीक श्रीतुळजाभवानी मंदीरात सत्कार सन्मान  करण्यात आला.

विश्वास परमेश्वर कदम यांचा सेवा कालावधी1988 ते 1991 (टेम्परवारी), 1991 ते 2015 (कायम) त्यांनी आजपर्यत  लाडू प्रसाद वितरण व धार्मिक लिपीक म्हणून काम केले तर धार्मिक लिपीक पदावरून सेवा निवृत्त  झाले. श्रीतुळजाभवानी मंदीर प्रशासनाकडून विश्वास परमेश्वर कदम आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या 38 वर्षांच्या निष्ठावान सेवेला मान्यता देण्यात आली. मंदीरातील लाडू प्रसाद वितरण आस्थापना पीआरओ व धार्मिक  लिपीक या जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. धार्मिक लिपीक म्हणून मंदीराच्या विविध धार्मिक आणि प्रशासनिक कामात सक्रिय सहभाग.


 
Top