धाराशिव (प्रतिनिधी)- बार्शीचे सुपुत्र व धाराशिव येथे शिक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले संतोष मारूती देशमुख यांनी आपल्या मातोश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कै . शारदा मारूती देशमुख यांच्या स्मरणार्थ श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्राचार्याकडे प्रशालेसाठी सामाजिक जाणिवेतून तब्बल 500 खुर्ची भेट देऊन रुढी परंपरेनुसार होणाऱ्या अवांतर खर्चाला फाटा देऊन नवीन आदर्श समाजापुढे उभा केला आहे . 

याबद्दल झालेल्या कार्यक्रमात आपल्या छोट्या खानी भाषणात संस्थाध्यक्षांनी प्रशालेचे शिक्षक संतोष देशमुख यांच्या मातोश्री कै. शारदा मारूती देशमुख सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आवाटी या छोट्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या स्मरणार्थ शालेय कामकाज व्यवस्थित पार पडण्यासाठी भौतिक साधनांची गरज असते. या जाणीवेतून केलेली मदतीबद्दल प्रशंसोद्गार काढून  समाजातून  दानशूर व्यक्तीकडून अश्या मदतीची गरजेचे असते , त्यामुळे दानशुर व्यक्तीने पुढे यायला हवे, असे विचार  संस्थाध्यक्षांनी  व्यक्त केले .

या कार्यक्रमास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, दै. आरंभचे मुख्य संपादक चंद्रसेन देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, बी.एम. गोरे, राजेंद्र जाधव, श्रीमती बी.बी. गुंड व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठया संख्येने विदयार्थी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले.

 
Top