तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडा अंतर्गत मंदीर परिसरात विविध विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याने सध्या ट्रायल बोर माध्यमातून पाया लागे पर्यत दगड कसा आहे याची तपासणी सुरु आहे.
राजमाता जिजाउ महाव्दार, राजेशहाजी महाव्दार श्रीकल्लोळ तिर्थकुंड शेजारी ट्रायल बोर माध्यमातून दगड तपासणी केली जात आहे. प्रत्येकी दहा फुटाला कशा प्रकारचा दगड आहे याची तपासणी करण्यात येत. सदरील चाळीस फुट किंवा त्या पेक्षा खोल ही दगड पाया तपासणी केली जात आहे. तपासणी नंतर याचा अहवाल आल्यानंतर पाया कुठे लागतो हे स्पष्ट होणार आहे. श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडा अंतर्गत भव्य दिव्य तीन प्रवेश महाव्दार उभारले जाणार आहेत त्यासाठी ही तपासणी मोलाची ठरणार आहे.