तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय 30 जुलै 2025 रोजी जारी केला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, संस्थेच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शासकीय तत्त्वावर महाविद्यालय हस्तांतरित करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय दृष्टीने योग्य निर्णय घेणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत :

प्रादेशिक सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, छ. संभाजीनगर अध्यक्ष किरण लाढाणे,  मुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी डॉ. स्मिता कोकणे, तहसीलदार, तुळजापूर अरविंद बोळंगे,  प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छ. संभाजीनगर संजय डंभारे, प्र. प्राचार्य, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय  सदस्य सचिव रविंद्र आडेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. 


 
Top