तुळजापूर (प्रतिनिधी)-ग्रामीण भागात वाढत्या बालविवाहाच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ‌‘हॅलो मेडिकल फाउंडेशन'ने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने येत्या 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर येथील लोहीया मंगल  कार्यालयात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे तालुक्यातील निवडक शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा, त्याची अंमलबजावणी, समाजप्रबोधन यासंबंधी प्रशिक्षण देणे. एक दिवसीय या कार्यशाळेत कायदाविषयक माहिती, तांत्रिक अडचणी, उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. उपस्थितीत तालुक्यातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी, महिला व बालकल्याण प्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, शिक्षक, ग्रामसेवक यांचा सहभाग राहणार आहे.

 
Top