परंडा (प्रतिनिधी)- भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन मंगळवार दि.1 जुलै रोजी सकाळी कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली.आसता भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्नीसह दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले.

ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच वारकऱ्यांचे हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नगर परिषदचे माजी गटनेते सुबोसिंह ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कुलकर्णी, युवानेते समरजितसिंह ठाकूर, पवार सर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर व वारकरी,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top