मुरुम (प्रतिनीधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षा 53 महाराष्ट्र बटालियन लातूर यांच्या अंतर्गत घेण्यात आली. यामध्ये बी प्रमाणपत्राच्या परीक्षेमध्ये सर्व कॅडेट्सनी अ ग्रेड प्राप्त केला व सी प्रमाणपत्राच्या कॅडेटसनी बी ग्रेड मिळवून प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी ही यशाची परंपरा कायम राखली. 

या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले सरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, नितीन कोराळे, राजकुमार सोनवणे, प्रा. गुंडाबापू मोरे, प्रा. शैलेश महामुनी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


 
Top