परंडा (प्रतिनिधी)- घरासमोर काढलेल्या चारीतील पाणी आत येऊन नुकसान होत आहे. याची दखल घेऊन चारीतील पाणी काढून द्यावे अन्यथा सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी श्रीमती मंगल चव्हाण यांनी दिला आहे. 

या संदर्भात चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून घरासमोरील चारीचे पाणी आत येत आहे. त्यामुळे घराचे व  पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान होत आहे. याबद्दल अनेक वेळा निवेदन देऊन देखील काही उपयोग झाला नाही. याची दखल घेऊन आपली समस्या सोडवावी अन्यथा सोमवार दि. 28 जुलै रोजी परंडा येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. असा इशारा मंगल चव्हाण यांनी दिला आहे.

 
Top