भूम (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण श्रावण मास रोज सायंकाळी सात वाजता महाआरती, आठ वाजता शिवलीलामृत ग्रंथ पारायण, प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते बारा कीर्तन व नंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत.

दि. 28 जुलै रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे कीर्तन, दि. 4 ऑगस्ट रोजी हभप किरण महाराज शिंदे यांचे कीर्तन, दि.11 ऑगस्ट रोजी हभप विनोदाचार्य संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन, दि. 18 ऑगस्ट रोजी हभप संतचरण गणेश महाराज अंधारे यांचे कीर्तन होऊन, सार्वजनिक महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी तुळजाई दुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दीपोत्सव होणार आहे. दि 18 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे व वृक्षाची वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन गणेश महाराज अंधारे यांनी केले आहे.




 
Top