भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे चिंचपूर शिवारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अवैद्य उत्खनन करणारी टिपर शेतकऱ्याच्या शेतातून बाणगंगा नदीकडे जात असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टिपर चालकास या संदर्भात शेतकऱ्याने जाब विचारला असता सदर शेतकऱ्यांस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती आशिकी फिर्यादी हर्षल दत्तात्रय शिंदे वय 27 वर्ष व्यवसाय शेती रा. चिचपुर यांना सचिन काळे व इतर दोघेजण दि. 25 जुलै रोजी रात्री 1 वाजता ढगे चिंचपुर येथील तळ्याचा कडेला, तक्रारदार व त्याचे मित्र प्रकाश तांबे व विश्वास ढगे असे शेतातील मोटार चालु करण्यासाठी ढगे चिंचपुर येथील तळ्याचा कडेवरुन जात असताना टिपर चालकास तुमचे टिपर आमचे शेतातुन जाते. त्यामुळे आमचे शेताचे नुकसान होते आहे. आमचे पायवाटा मोठ्या होवुन चिखल होतो. आम्हाला येथुन वावरता येत नाही असे म्हणताच विरोधक क्र 1 व 2 यांनी शिवीगाळ करुन तक्रार दार व त्याचे मित्रास लाथाबुक्यांनी चापटाने मारहाण केली व विरोधक क्र 3 व 4 यांनी शिवीगाळ करुन आमच्या नादी लागलास तर जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आम्ही महसुल अधिकारी यांचेवर दंगङ फेक केली तरी आम्हाला काही झाले नाही तुम्हाला मारले तरी काही होणार नाही अशी धमकी दिली. वगैरे वरुन मा. पो.नि कानगुडे सो अदखलपात्र गुन्हा दाखल करुन करुन पुढील तपास शिंदे करीत आहेत.