धाराशिव (प्रतिनिधी)-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव यांच्या वतीने युवराज नळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचेकडे मराठी भाषा विद्यापीठ व संशोधन केंद्र धाराशिव येथे होणे बाबत मागणी केली होती. धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या प्रवर्गात मोडत असल्याने व मराठवाडा मुक्ती संग्राम चे देखील प्रमुख केंद्र राहिला असल्याने मराठी भाषा विद्यापीठ व संशोधन केंद्र धाराशिव येथे होणे आवश्यक असल्याचे देखील प्रतिपादन केले होते. त्या अनुषंगाने आ राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठी भाषा मंत्री ना उदयजी सामंत यांच्याकडे लेखी पत्र देऊन सदर विषयावर बैठक लावणे बाबत निवेदन दिलेले आहे.

 
Top