धाराशिव (प्रतिनिधी)- जास्त परतावेचे आमिष दाखवून ऑनलाईन गेमींगद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात धाराशिव सायबर पथकास यश आले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील तडवळे गावात पोलिस पथकाने छापा टाकला असता उत्तरेश्वर दामोधर इटकर वय 45 वर्ष धंदा मार्केटींग रा. सोनेसांगवी, ता. केज, जि. बीड व अस्लम दस्तगीर तांबोळी वय 32 वर्ष धंदा मार्केटींग रा. शेळका धानोरा, ता. कळंब जि. धाराशिव यांना लोकांना गेमींग लिंक पाठवून कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन जुगार खेळवत होते. पोलिस पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटींगच्या तपासणीत काही जण असल्याचे उघड झाले. आरोपी ने दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेमचे लॉगींन आयडी, पासवर्ड इतर तीन आरोपी पाठवत असल्याचे सांगितले. यामध्ये सुरज घाडगे रा. सातेफळ ता. केज जि.बीड, नामदेव कांबळे रा. अंबेजोगाई जि. बीड व एम. डी. पाटील रा. नांदेड यामध्ये या तीन आरोपींचा समावेश आहे. या पाचही आरोपींने संगनमत करून शासनाने बंदी घातलेल्या ऑनलाईन गेम्सच्या लिंक्स व्हॉट्सॲप वर पाठवून अनेकांची आर्थिक फसवूणक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक रितू खोखर व अप्पर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक कासुळे, सफौ कुलकर्णी, पोहक हालसे, मपोना पौळ, पोशि जाधवर, पोशि भोसले, पोशि मोरे, पोशि तिळगुळे, पोशि कदम, पोशि काझी, मपोशि शेख, मपोशि खांडेकर, पोशि शिंदे, पोशि पुरी, पोशि अंगुले, पोशि बिराजदार व पोशि गाडे यांनी केली आहे.