धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्याचा आर्थिक चेहरा मोहरा बदलत शेतकरी व युवकांना न्याय देणारा ‘तारा’ अर्थात तुळजाई शेती उत्पन्न वृद्धी प्रकल्प या एकत्रित शेतकरी उत्पन्न वृद्धी प्रकल्पा अंतर्गत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आता EoI द्वारे प्रकल्पात सहभागी होण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.

फळं, भाजीपाला व इतर शेतीमालावर प्रक्रिया करून मूल्यवृद्धी करणे, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज ची सुविधा निर्माण करणे, कृत्रिम किंवा वनस्पती-आधारित स्त्रोतांपासून व्हेगन लेदर ची निर्मिती करणे, Compressed Bio Gas ची निर्मिती करणे, तसेच MSME Park च्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना देखील या प्रकल्पात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे अपेक्षित आहे. 

तारा प्रकल्पाच्या प्रस्तावित माळूंब्रा, ता. तुळजापूर येथील १२०० एकर जागेचे अनेक बलस्थाने आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतचे स्थान, जागेतून जाणारी रेल्वेलाइन, २२० kV चे सबस्टेशन आणि पाण्याची मुबलकता पाहता उद्योजकांसाठी हा योग्य पर्याय ठरणार आहे. 

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. 24.04.2025 रोजीच्या बैठकीत तारा प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त, ग्रांट थॉर्टन इंटरनेशनल कंपनी आणि मित्र संस्थेतील तज्ज्ञांवर सोपविण्यात आली असून, MIDC देखील यात सहभागी असेल. या प्रकल्पाच्या अनुषंगाने तुळजापूर येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये मित्र चे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी EoI बाबत सूचना दिल्या आहेत. सदर बैठकीस मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top