तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात 1 ऑगस्ट 2025 पासून 10 ऑगस्ट 2025 पर्यंत जीर्णोद्धाराचे काम सुरू राहणार असून, या काळात धर्मदर्शन व देणगी बंद राहणार आहे.
मध्यप्रदेश बंगाल चे पाच कारागीर हे काम करणार!
सिंह गाभाऱ्यातील वरच्या बाजुचे प्लास्टर का कार्यक्षमता संपल्याने ते काढुन आता चुन्यात काम केले जाणार असुन यासाठी दोन बंगाल तिन मध्य प्रदेश चे कारागिर काम करणार असुन यांना सात मजुर सहकार्य करणार आहेत.
पुरातत्व खात्यामार्फत हे काम हाती घेतले जात असून, मंदिर प्रशासनाने जाहिर केले आहे. या दरम्यान सिंहासन पूजन, अभिषेक पूजा व मुखदर्शन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
भक्तांनी हे लक्षात घ्यावे:
1 ते 10 ऑगस्ट सिंहासन दर्शन बंद, इतर विधी, अभिषेक, मुखदर्शन नियमित सुरू राहणार.
भाविकांनी प्रशाषणाला सहकार्य करावे - तहसिलदार अरविंद बोळंगे
या कालावधीत देविदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांनी या जिर्णोध्दार प्रकरणी प्रशासनाला सहकार्य करावे व सूचनांचे पालन करावे. असे आवाहनतहसीलदार अरविंद बोळंगे यांनी आवाहन केले आहे.