तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील धाराशिव रस्त्यावरील एका होलसेल दुकानात सकाळी तब्बल 68 हजार रुपये रक्कम असलेली बँग अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही घटना बुधवार सकाळी 9.45 वाजता घडली.
तेजस संतोष बोबडे यांचे साखर व इतर किरकोळ मालाचे होलसेल दुकान असलेल्या ठिकाणी, कामगार दुकान साफसफाईसाठी पाठीमागे गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बँग उचलली आणि क्षणात मोटरसायकलवरून पसार झाले. सदर चोरटे तीन जण असल्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे.