तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सव सोहळ्यातील दसरा ते पौर्णिमा या काळात देवीच्या श्रम निद्रेसाठी बनवण्यात येणाऱ्या लाकडी पलंगाच्या कामाचा मुहूर्त गुरुपौर्णिमेनिमित्त नगरचे तेली पलंगाचे मानकरी (तेली) कुटुंबीय आणि पलंग बनविणारे ठाकूर कुटुंबीय यांच्या हस्ते संपन्न झाले. पलंगाचे कातीव आणि रंग काम पूर्ण होऊन जोडणी करता साधारणता तीस ते पंचचाळीस दिवस लागतात.