तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरात नवीन बस स्थानकाच्या परिसरात उभ्या असलेल्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार शनिवार दि12रोजी दुपारी  घडला या प्रकाराने शहरासह तालुक्यातील पालक वर्गात मुलींचा सुरक्षा बाबतीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी  पोलीसांनी  मात्र बग्याची भूमिका घेतल्याचा आरोप पालकवर्गातुन केला जात आहे. मुलीची छेडछाड झाली ते ठिकाण तसेच तेथुन ही मंडळी कुठे गेली होती. यातील जिथे जिथे सीसीटीव्ही पाहुन पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

नवीन बस स्थानकाच्या परिसरात भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर काही सामाजिक कार्यकत्यांनी हे प्रकरणा मिटवल्याची चर्चा आहे. अशा प्रकारांमुळे गरीब घरातील मुलीना न्याय मिळणार नाही का? असा सवाल निर्माण होतो. छेडछाड करणाऱ्यांना वेळीच प्रतिबंध नाही केला तर  यामुळे टवाळखोरांची हिंमत वाढण्याची शक्यता पालकामधून व्यक्त केली जात आहे.


 
Top