धाराशिव (प्रतिनिधी)- मेडिकल कॉलेज सुरू झाल्यापासून येथील रूग्णालयात अत्यंत क्लिस्ट शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे चांगल्या उपचार पध्दतीमुळे 50 टक्के मृत्यूदरात घट झाली आहे अशी माहिती मित्र उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मेडिकल कॉलेजचे डीन शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.
धाराशिव मेडिकल कॉलेजमध्ये शनिवार दि. 12 जुलै रोजी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार पाटील यांनी आस्थीरोग विभागात 40 वर्षीय रूग्णाच्या मणक्याची अतिशय क्लिस्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. वाशी तालुक्यात झालेल्या फटाक्याच्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या मुलीवर प्रथमच प्लास्टिक सर्जरी सुध्दा यशस्वी करण्यात आली. नवीन तंत्रज्ञानामुळे गुडख्याच्या शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. वयोवृध्दांना ग्रंथीमुळे होणार आजार व मुतखडाच्या आजारावरील उपचारासाठी युरॉलॉजी सेट उपलब्ध झाला आहे. मेडिकल कॉलेजच्या तज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक साधन सामग्री यामुळे मृत्यूदरात व पेशेंट रेफर करण्याच्या दरात घट झाली आहे. 2023 साली वर्षाभरात 80 रूग्णांचा मृत्यू झाला होता. तर 2024 साली 60 रूग्णांचा मृत्यू झाला. जुलै 2025 पर्यंत 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदरात 25 टक्के घट झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
500 खटाचे हॉस्पिटल होणार
मेडिकल कॉलेज व 500 बेडचे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यासाठी आयटीआय व सिंचन विभागाची जागा मेडिकल कॉलेजकडे हस्तांतरीत झाली आहे. नवीन हॉस्पिटल उभारणीसाठी 329 कोटी रूपये तर मेडिकल कॉलेजसाठी 350 कोटी रूपये लागणार आहेत. यासाठी एशियन बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जात आहे. लवकरच हॉस्पिटलचे काम सुरू होईल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
नवीन आयटीआय कंपन्या बांधणार
धाराशिव शहरातील आयटीआयची पूर्ण जागा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलसाठी हस्तांतरीत झाली आहे. त्यामुळे नवीन आयटीआय देशपांडे स्टँन्ड जवळील टेक्निकल स्कूल येथे बांधणार आहेत. आयटीआयच्या बांधकामाच खर्च औद्योगिक कंपन्या त्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून बांधणार आहेत. आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना लगेच जॉब पण मिळणार आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
एमआरआय मशीन 1 महिन्या येणार
मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलसाठी अत्यावश्यक असलेले एमआरआय मशीन 1 महिन्याच्या आत शुरू होईल. त्यासाठी संबंधितांकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरिपी, डेंटल कॉलेज, फार्मसी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच 162 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार असून, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान मिळावे यासाठी नागपूरच्या एम्सचे दर महिन्याला ऑनलाईन व्याख्यान असते. असे सांगितले.