धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यकर्त्यांवर संतप्त भावना व्यक्त करण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे लातूरमधील झालेला प्रकार चुकीचा आहे. या संदर्भात मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. तर कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री यांच्या निषेधाच्या देत कर्जमाफीच्याही घोषणा दिल्या.
लातूर येथे छावा संघटनेचे विजय घाडगे यांना माराहाण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 21 जुलै रोजी धाराशिव दौरा होता. आपल्या दौऱ्याची सुरूवात सुनिल तटकरे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून तुळजापूर येथून सुरू केला. तुळजापूर येथील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली व ते धाराशिवला आले. त्यांनी मेळावा घेवून नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना तटकरे यांनी जळगाव, धुळे, बीड, लातूर येथे मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेण्यासाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ मिळेल असेही तटकरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत हे दिवसभरात सत्तेचे स्वप्न पाहतात. त्यामुळे स्वप्नात जे दिसते ते बोलतात. असे म्हणून त्यांची खिल्ली उडवली. जिल्ह्यातील विकास कामाच्या स्थगिती विषयी बोलताना मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.