धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीसांची व्यावसायीक नेपुण्य, गुण्वत्ता कौशल्य कार्यक्षमता व दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली 20 वा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-2025 चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथील पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात धाराशिव सघाला उपविजेते पद मिळाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 03 अधिकारी व 19 अंमलदार यांनी पोलीस कर्तव्य मेळावा 2025 मध्ये भाग घेवून धाराशिव संघास 07 सुवर्ण पदक तर 07 रजत पदक व 06 कांस्य पदक प्राप्त करुन धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे टिमने उपविजेते पद पटकावले.
यांना मिळाले पारितोषिक
तसेच धाराशिव जिल्हा पोलीस संघाचे अधिकारी व अंमलदार यांनी पुढील श्रेणी ज्यामध्ये शास्त्रशुध्द पध्दतीने तपास, गुन्हे तपास, फौजदारी कायद्याचे कलम, न्यायालयीन निर्णय, लेबलिंग, पॅकिग, फोटोग्राफी टेस्ट, व्हिडीओग्राफी टेस्ट वैज्ञानिक सायन्सची तपासात मदत या विषयामध्ये सांघक परिक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये वैज्ञानिक सायन्सची तापासात मदत- पो.नि. रविंद्र गायकवाड, धाराशिव यांना (सुवर्ण पदक), स.पो.नि. सुरज देवकर (रजत पदक), पोउपनि चंद्रकांत बनसोडे (कांस्य पदक), गुन्हे तपासात फोटोग्राफी टेस्ट- पोउपनि चंद्रकांत बनसोडे(रजत पदक), स.पो.नि. सुरज देवकर(कांस्य पदक), गुन्हे तपासात लेबलिंग, पॅकिग- स.पो.नि. सुरज देवकर(सुवर्ण पदक), पोउपनि चंद्रकांत बनसोडे(सुवर्ण पदक), फिंगर प्रिंट- पोउपनि चंद्रकांत बनसोडे, (सुवर्ण पदक),फौजदारी कायद्याचे कलम न्यायालयीन निर्णय- सपोनि सुरज देवकर (कांस्य पदक), शास्त्रशुध्द पध्दतीन तपास तोंडी चाचणी- पोनि रविंद्र देवकर, (सुवर्ण पदक), सपोनि सुरज देवकर (कांस्य पदक), पोलीस फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी स्पर्धा-पोलीस हावलदार- दिपक जाधव, धाराशिव (सुवर्ण पदक), शास्त्रशुध्द पध्दतीने तपास- पोलीस नाईक लहु पाटील (रजत पदक), संगणक कौशल्य क्षमता लेखी परिक्षा- पोलीस अमंलदार ए.ए. तिळगुळे, (रजत पदक), संगणक कौशल्य चाचणी- ए.एस. मोरे. एम.एम. काझी धाराशिव, (रजत पदक) घातपात विरोधी तपासणी चाचणी (एक्सेस कंट्रोल)- पोलीस हावलदार डी.बी. काळबंडे (रजत पदक), महिला पोलीस अंमलदार आर. ए. शेख,(कांस्य पदक), असे एकुण धाराशिव संघास 07 सुवर्ण पदक तर 07 रजत पदक, 06 कांस्य पदक प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. या मध्ये उपविजेते पद धाराशिव यांनी पटकावले आहे.
दि.08.07.2025 रोजी पोलीस अधीक्षक सभागृहात पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या हस्ते सदर अधिकारी व अंमलदार यांचा पदक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.सदर सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा पोलीस संघाने केली आहे. यावेळी पोनि इज्जपवार अधिकारी अंमलदार उपस्थित होते.