भूम ( प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या भूम परंडा वाशी चे समन्वयक बाळासाहेब क्षिरसागर यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी निवड झाले आहे .भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर यांनी परंडा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे काम ताळागाळापर्यंत पोहोचले असून त्यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे .त्यामुळे पक्षाने महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी त्यांची निवड केली आहे .त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .