धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्याच्या दृष्टीने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आग्रही असून परीपुर्ण प्रस्ताव राज्य सरकार मार्फत केंद्राकडे पाठविणेबाबत प्रशासनास सुचना केल्या. केंद्रीय विद्यालयाची गरज, संभाव्य जागेची निवड, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच सदर विद्यालयाकरीता शहरातील भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा व राघुचीवाडी येथील 5 कि.मी. अंतराच्या आतील दोन्ही जागेचे प्रस्ताव पाठविणेबाबत संबंधीतांना  सुचवण्यात आले.

सदर बैठकीत वरील दोन्ही जागेचा विचार करुन परीपुर्ण असा प्रस्ताव राज्यमार्फत केंद्राकडे पाठविण्याबाबत देखील सुचित करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. किर्तीकुमार पुजार जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनक घोष, उपविभागीय अधिकारी श्री. ओमकार देशमुख,  तहसिलदार मृणाल जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके रिजनल विभाग सोलापूरचे श्री. उमाकांत जोशी उपस्थीत होते.

 
Top