धाराशिव (प्रतिनिधी)-सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी परिसंवाद करून त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान मान्य करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रम जिल्ह्यात सहकार मूल्यांची रुजवणूक आणि सहकारी चळवळीला प्रशासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बळकटीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक (सह. संस्था) पांडुरंग साठे, कार्यालय अधीक्षक डी. ए. जाधव, सहकार अधिकारी ए. आर. सय्यद, जिल्हा सह. विकास अधिकारी मधुकर जाधव, पर्यवेक्षक अतुल कुलकर्णी, वरिष्ठ लिपिक अतुल पवार, सांख्यिकी सहाय्यक कस्तुरे अमोल, मुख्य लिपिक सविता मोरे, वर्षा भोसले, सहाय्यक सहकार अधिकारी आशा कांबळे, सेवक सरस्वती मोटे, मेंगले संजय, दत्ता शिंदे आणि युवक प्रशिक्षणार्थी वैभव साळुंखे यांची उपस्थिती लाभली. सन्मान प्रसंगी श्री. सिद्धीविनायक जिल्हा पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास कुलकर्णी, फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक गजानन पाटील, मार्केटिंग प्रमुख रामचंद्र सारडे, मल्टीस्टेट प्रशासन प्रमुख दिनेश इंगळे, आय.टी. प्रमुख प्रशांत वाघमारे, सेवक नागनाथ क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.


सहकार क्षेत्रातील दुरदृष्टीमुळे फाऊंडेशनचा पुढाकार

सहकार क्षेत्रात नव्या पिढीला संधी मिळावी, सहकार चळवळीला गती मिळावी व सहकारी संस्था आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सक्षम बनाव्यात. या दृष्टीने दत्ता कुलकर्णी यांची दूरदृष्टी प्रेरणादायी आहे. त्यांनी नेहमीच सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले असून, सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन श्री. सिद्धीविनायक परिवार व सोशल फाऊंडेशन अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत आहे.


 
Top