तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे गुरुवार दि 24 जुलै पासून नागनाथ महाराज यात्रेस गुरुवारी अमावस्येदिनी नागनाथ महाराज मुर्तीस रुद्र, अभिषेक, पंचआरतीसह, मानकऱ्यांच्या हस्ते मुख्यपुजारी सद्गुरु स्वामी महाराज यांना कंकण बांधून, व नाग, पाल, विंचू, यांच्या आगमनाने प्रारंभ झाला.
याठिकाणी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग पाल विंचू-हे उभयचर जिव श्री नागनाथ महाराजांच्या मंदिरा समोर एका शिळेखाली अमावस्यापासुन पाच दिवस एकत्रित वास्तव्य करतात. त्या निमित्ताने नागपंचमी दिवशी सावरगाव येथे मोठी यात्रा भरते, यावेळी मोठा जनसागर नागनाथाच्या दर्शनासाठी उसळलेला असतो . मंगळवारी 29 जुलै रोजी मंदिराचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांची हनुमानच्या मंदिरापासून खर्ग संचारलेल्या अवस्थेमध्ये गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक होऊन नागनाथ देवस्थानातील भाकणूक कट्ट्यावर आल्यानंतर वर्ष भाकणूक. खरग डोहास्नान होऊन महा आरतीने यात्रेची सांगता होते.
सर्वजाती धर्मला याञेत मान
या यात्रेत गावगाड्यातील अठरापगड जातींना मान असून यात मराठा, लिंगायत, माळी, कोळी, न्हावी, चर्मकार, या समाजांना मान आहे. गुरुवार दि.24 जुलै ते मंगळवार 29 जुलै यादरम्यान सर्व मानकरयांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पडतात. मंगळवार दिनांक 29 जुलै नागपंचमीदिनी नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. गण -पालखी मिरवणूक, वर्ष भाकणूक, दहीहंडी, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम होऊन यात्रेची सांगत होते.