धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनेची बुलंद तोफ आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये दि.25 जुलै रोजी जाहीर प्रवेश केला. दरम्यान, तौफिक काझी यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदाची तर इरफान शेख यांच्यावर अल्पसंख्याक विभागाच्या धाराशिव शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुणांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.

आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव कळंब-विधानसभा अध्यक्ष शौकत शेख व युवा नेते अबरार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली व  ख्वॉजा नगर येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव, कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे, पंकज पाटील, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर,  कलीम कुरेशी, छोटा साजिद अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष तौफिक काझी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इरफान उर्फ इब्राहिम शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top