धाराशिव (प्रतिनिधी)- 3 जुलै रोजी पहाटे धाराशिव शहरातील सराफ लाईन परिसरातील तिरुपती ज्वेलर्स, विघ्नहर्ता ज्वेलर्स आणि राधा ज्वेलर्स या तीन दुकानांमध्ये दुकानफोडीचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतीचे वातावरण निर्माण झाली होते. पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी सराफ लाईनमध्ये दोन हत्यार बंद पोलिसांची गस्त देण्याचे आदेश दिले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष दत्ता माळी, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तानाजी मुंडे, कार्यकारी अध्यक्ष कृष्णा डहाळे व योगेश शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळी 7 वाजता पीडित दुकानदारांसह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर फेडरेशनच्यावतीने पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक शेख यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक यांनी सर्व सराफ बांधवांची मागणी ऐकून घेऊन बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार शहर पोलीस निरीक्षकांनी सराफ लाईन परिसरात दोन हत्यारबंद पोलीस गस्तीसाठी नेमले. या तात्काळ कारवाईबद्दल संघटनेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी दत्ता माळी, तानाजी मुंडे, कृष्णा डहाळे, मयूर जालनेकर, कृष्णा नाईकनवरे, राजेश कदम, रघुवीर चित्राव, सच्चिदानंद पोद्दार, तसेच इतर पदाधिकारी व सराफ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top