तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथे हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण केला. मंदिर संस्थानच्या वतीने गौड कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.