धाराशिव (प्रतिनिधी)-  महिला व बाल विकास विभागाच्या “लाडकी बहिण“ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सचिव,महिला व बाल विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 9 जून 2025 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली.त्यानुसार,लाभार्थी महिलांनी एकत्र येऊन स्वतःची पतसंस्था नोंदवावी,जेणेकरून त्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल,असा उद्देश आहे.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. 11 जून 2025 च्या परिपत्रकानुसार, महिला पतसंस्था खालीलप्रमाणे विविधस्तरांवर नोंदविण्यात येऊ शकतात.असे नमूद केले आहे.

कार्यक्षेत्र नगरपालिका - प्राथमिक सभासद संख्या 500 महिला.नोंदणी समयी भाग भांडवल 5 लाख रुपये.गाव -प्राथमिक सभासद संख्या 250.नोंदणी समयी भाग भांडवल 1 लक्ष 50 हजार रुपये. तालुका स्तर - 500 प्राथमिक सभासद संख्या,नोंदणी समयी भाग भांडवल 5 लक्ष रुपये आणि जिल्हा स्तर 1500 महिलांपर्यंत 10 लाख रुपये.असे निश्चित केले आहे.

या उपक्रमामुळे महिलांना स्वतःच्या आर्थिक गरजांसाठी पतपुरवठा सहज शक्य होईल,तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण साधले जाईल.या निर्णयाची माहिती जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था श्री. पांडूरंग साठे यांनी दिली असून,त्यांनी जिल्ह्यातील महिलांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे अधिक तपशील संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयात मिळू शकतील.

 
Top