धाराशिव (प्रतिनिधी)- डॉक्टर्स डे तसेच कृषी दिनाच्या निमित्ताने धाराशिव रोटरी क्लब आणि आयएमए वुमन्स विंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 55 पुरुष तसेच 15 महिला,अशा एकूण 70 दात्यांनी रक्तदान केले.हे शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी येथे घेण्यात आले.
रोटरी क्लबच्या नवीन वर्षाची सुरूवात 1 जुलै रोजी होते. यानिमित्ताने धाराशिव रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष रणजीत रणदिवे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉक्टर्स डे तसेच कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव रोटरी क्लब व आयएमए वुमन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि. 1) रोजी सकाळी 9 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 70 तात्यांनी रक्तदान केले.उल्लेखनीय बाब म्हणजे महिला डॉक्टरांनी देखील रक्तदान करून सामाजिक दायित्व दाखवून दिले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. सचिन देशमुख यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी धाराशिव रोटरी क्लबच्या वतीने डॉक्टर्स, सीए व शेतकऱ्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अध्यक्ष रणजित रणदिवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष रणजित रणदिवे,सचिव प्रदीप खामकर, आयएमए वूमस्व विंगच्या अध्यक्षा डॉ.कौशाली राजगुरू व सचिव डॉ. श्रध्दा मुळे यांच्यासह धाराशिव रोटरीयन तसेच वुमन्स विंगच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.वैद्यकीय अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.