भूम प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषी प्रक्रिया पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे दिनांक 1 जुलै रोजी सोलर व इंडक्शन मशीन वरती खवा निर्मिती या प्रकल्पासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, सचिव दीपक पाटील व इतर मान्यवर यांचे हस्ते विनोद जोगदंड यांना प्रदान करण्यात आला.
धाराशिव जिल्हयातील भूम तालुका हा खवा निर्मितीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. ह्या खव्याला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी . विनोद जोंगदड ह्यानी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. भूम तालुक्यात दररोज 25-30 टन खवानिर्मिती होते. जवळपास 500 हून अधिक खवा भट्या भूम तालुक्यात आहेत. ह्या खवानिर्मितीसाठी जळण म्हणून मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो. व उत्पादनखर्चात वाढ होऊन पर्यावरणावर ह्याचा विपरित परिणाम होतो. विनोद जोंगदड यानी भूम तालुक्यामध्ये सोर उर्जेवर चालणारा पहिला खवा प्रकल्प उभारला आहे. इंडक्शन मशिनच्या साहाय्याने रोज 1 टनावर खवा निर्मिती ते करत आहेत. त्याचबरोबर जवळपास तीन ते चार टन जळावू लाकडाची पण बचत करत आहेत. 2 एकर जमिनिवर त्यानी 500 किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रोजक्ट उभा केला आहे.खवा निर्मिती झाल्यानंतर अतिरिक्त विज ते ग्रीडला पुरवतात. पर्यावरणपूरक, स्वच्छ व कमी खर्चात खवानिर्मितीचा प्रकल्प स्थापून. विनोद जोंगदड यानी महाराष्ट्रातील कृषि प्रक्रिया उद्योगजगापुढे एक आगळा आदर्श ठेवला आहे .त्यामुळे त्यांना वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला .