परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील साधारण शेतकऱ्याच पोर म्हणजे रामभाऊ भगवान पवार हे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात जाऊन व्यवसायाचे धडे घेत राहिले . आपल्या सोज्वळ वाणीमुळे पुण्यातील व्यवसायीकांनी त्यांना जवळ केले . या संधीच सोन करायच रामभाऊनी स्वप्न पाहिल आणि पुण्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले. अहोरात्र मेहनत घेऊन थोरामोठ्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसले . मोठे उद्योजक झाले तरी आपल्या जन्म गावाला विसरले नाहीत . पुणे शहरात उद्योग विस्तार चांगलाच वाढविला परंतु जन्मगाव करंजा तालुका परंडा या भूमित जनसामान्यासाठी आपली सेवा घडावी यासाठी परंडा शहरात भूखंड घेऊन भव्य दिव्य संकूल उभा केल . त्याच बरोबर गोरगरीब जनतेला मोठ्या आजारासाठी बार्शी जावे लागते अपंग व्यक्तीली गैरसोय होते . सर्वसाधारण लोकांची हेळसांड होते . ही समस्या पाहुन कमीत कमी जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन समाजाचे कांही देणं लागत . त्यातून उतराई व्हाव म्हणून सुर्यप्रभा नावाच टोलेजंग हॉस्पिटल उभा केल . रुग्णांची गैर सोय होऊ नये म्हणून एक्स रे , ऑपरेशन , डायालेसीस इत्यादिचा अधूनिक मशीन व सर्व सुविधा उपलब्ध करून दिली . एवढेच नाही तर 'भारत पंतप्रधान आरोग्य योजना व परंडा - भूम -वाशी या विधान सभा मतदार संघात प्रथमच “ महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उदघाटन रामभाऊ पवार यांच्या दिवसाचे औचित साधून केले . राजकाराणा पासून अलिप्त राहून परंड्याच्या विकासाच शिखर गाठले . याचे कौतुक विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी तोंड भरून कौतुक केले . दि 29 जून रोजी तालुक्यातील माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर , वरिष्ठ विधीज्ञ दादासाहेब खरसडे ,महादेव अंधारे , माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी , वाजीर दख्खणी, आदिंनी रामभाऊ पवार यांच्या विकास कामा बद्दल कौतुकाचा वर्षाव केला . यावेळी आपल्या मातीची ईमान राखून केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती देण्यासाठी तालुक्यातील खेडयापाडयातून हितचिंतक यांनी प्रतेक्ष हजर होऊन रामभाऊचे अभिष्ठचिंतन केले . या कार्यक्रमासाठी , नानासाहेब पवार , डॉ . मनोज शिंदे ,पै. नवनाथआप्पा जगताप , पै विशाल देवकर , मावली गोडगे , अमोल शिंदे , रामभाऊ पवार मित्र परिवारचे , तसेच छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले . सार्वजनिक विकासाचे शिखर गाठल्याने रामभाऊ पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.     

 
Top