धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती अधारे परसु लक्ष्मण चव्हाण रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी धाराशिव याने घरफोड्याचे गुन्हे केले असल्याचे समजले. सदर आरोपी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याचे समजल्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेतले. अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण असे दोघांनी मिळून केला असल्याचे सांगीतले. त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याचेकडे त्याबाबत विचारपुस केली असता त्याने ते सोन्याचे दागिने सदर गुन्ह्यातील असल्याचे सांगीतले व पैशाची गरज असल्याने मी ते दागीने विकण्यासाठी घेवून आलो होतो असे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन दोन तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2 लाख 52 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कार्यवाही कामी मुद्देमालासह आरोपीस पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके, आयकर युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कराळे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सावंत, पोलीस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पोह मनोज जगताप, चालक पोह महेबुब अरब, पोअं प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचे पथकाने केली आहे.

 
Top