तुळजापूर (प्रतिनिधी)-  जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून 19 जुलै रोजी राबविण्यात आलेल्या ‌‘हरित धाराशिव अभियान  2025' अंतर्गत 15 लक्ष वृक्ष लागवडीनंतर अखेर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून, त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

“एक पेड माँ के नाम“ या भावनिक व सामाजिक संदेशातून प्रेरणा घेत संपूर्ण जिल्हाभर मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडी नंतर आज प्रथमच झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, हा पाऊस म्हणजे जणू निसर्गाने या अभियानाला दिलेली एक सकारात्मक पोचपावती असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांतून एकच भावना व्यक्त होत आहे . “तुमचं कार्य योग्य दिशेने चाललंय, मी तुमच्या सोबत आहे!“ असे आज जणू पावसाने सांगितले. हे अभियान केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून, सततच्या संगोपनातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ जिल्हा पातळीवर रुजविण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. “हरित धाराशिव अभियान“ म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी एक सामूहिक वाटचाल. आजचा पाऊस ही त्या प्रयत्नांची झालेली फलनिष्पत्ती आहे.

 
Top