धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात यावा, यासह इतर मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अन्यथा या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (दि.2) निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, निवडणूकीपूर्वी महायुती सरकारमधील तीनही पक्षाच्या नेत्यांनी शेतकयांना सरसगट कर्जमाफी देणार, सात-बारा कोरा करणार, त्याचप्रमाणे शेतकरी सन्माननिधी योजनेतून मिळणाया निधीमध्ये 3 हजार रुपयांची वाढ करु, शेतकरी धान्यखरेदीसाठी भावांतर योजना लागु करु आदी मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर आश्वासन दिली होती. परंतू काहीच अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकयांची अवस्था बिकट असून शेतकयांना वरील तीनही मागण्या चालु अधिवेशनामध्ये मंजूर करुन तातडीणे अमलबजावणी करावी. अन्यथा या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.