परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक आणि सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजित फाऊंडेशनतर्फे “धन्यवाद देवाभाऊ... जनसेवेच्या वाटचालीला सलाम!” या संकल्पनेअंतर्गत समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत ब्रम्हगांव ता.परंडा येथील ‌‘आपला आधार' वृद्धाश्रमात राहणाऱ्या गरजू आणि निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी 500 किलो किराणा साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये तूरडाळ, मसूर दाळ, हरभरा दाळ, तांदूळ, ज्वारी, राजमा, गरा, साखर, मूग व उबदार ब्लँकेट्स यांचा समावेश आहे.

या उपक्रमात अजित फाउंडेशनचे कार्यकर्ते, स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे या सेवाभावी कार्याचे खरे फलित ठरले.

आपला आधार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष झुल्फिकार काझी म्हणाले, “आमच्या वृद्धाश्रमात गरजू व निराधार ज्येष्ठ नागरिक रहात असून त्यांची देखभाल व काळजी घेण्याचे कार्य आम्ही प्रेमाने करत आहोत. ग्रामीण भागात अनेक वृद्धांना आधार देणाऱ्या अशा संस्थांसाठी समाजाचा हातभार लागणे गरजेचे असते.अजित फाऊंडेशनने दिलेली मदत आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.अशा सामाजिक संस्था, ट्रस्टच्या पाठबळामुळेच आमची सेवा अधिक प्रभावीपणे करता येते.अशा सामाजिक समर्पित उपक्रमात सहभागी होणे, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.” यावेळी आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी,तौफिक मशायक, सोहेल काझी व वृद्धाश्रमातील आजी,आजोबा उपस्थित होते. 


'धन्यवाद देवाभाऊ' ही संकल्पना एक सामाजिक चळवळ म्हणून महाराष्ट्रभर रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरुण पिढीने जनसेवेचा वारसा पुढे न्यावा, म्हणून अशा उपक्रमांची प्रेरणा आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोककल्याणकारी नेतृत्व व समाजाभिमुख कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, गरजूंच्या चेहऱ्यावर अजित फाउंडेशनच्या माध्यमातून हास्य फुलवता आले तर त्याहून मोठा वाढदिवसच साजरा नाही.

महेश निंबाळकर,अध्यक्ष- अजित फाऊंडेशन बार्शी.

 
Top