परंडा (प्रतिनिधी)- चाकूचा धाक दाखवून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पिडीत मुलगी व तिच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी अंबी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार दि.14 जुलैच्या मध्यरात्री दरम्यान भूम तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातील लाईट गेल्याने घराच्या अंगणात झोपली होती. रात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच तरूणांनी सदर मुलीला काही अंतरावर नेले. यातील एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. पिडीत मुलीची आरडाओरडा ऐकून तिची आई या ठिकाणी आली असता आरोपींनी पिडीत मुलीला व तिच्या आईला मारहाण केली. पाचही अरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी. अशी मागणी पिडीत मुलीच्या आईने केली आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून अंबी पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल दाखवल करण्यात आला आहे.