तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरद्वारे संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्यासाठीची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधी शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध करून उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, 05 ऑगस्ट 2025 पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहीती पञकार परिषद घेवुन प्राचार्य डाँ ओमप्रकाश राजनकर यांनी दिली.

यावेळी बोलताना प्राचार्य डाँ राजनकर पुढे म्हणाले कि या  ऐतिहासिक निर्णयामुळे मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार असून, नवीन रोजगार व व्यवसाय संधींना चालना मिळणार आहे. या निर्णयामागे मोलाचा वाटा  आमदार चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र), आमदार राणाजगजितसिंह पाटील (आमदार, तुळजापूर)  ज्यांच्या मार्गदर्शनामुळे व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया शक्य झाली.

किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव, ओंकार देशमुख, उपविभागीय अधिकारी, तुळजापूर, अरविंद बोळंगे, तहसीलदार, तुळजापूर, माया माने, तहसीलदार तथा व्यवस्थापक, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच  तुळजापूर येथील नागरिक, पत्रकार, माजी विद्यार्थी, व माध्यम प्रतिनिधी यांचेही मनःपूर्वक आभार. ही प्रक्रिया तंत्रशिक्षणाच्या लोकाभिमुखतेकडे एक ऐतिहासिक वाटचाल ठरणार आहे. या प्रसंगी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर, उपप्राचार्य रवींद्र मुदकन्ना, प्रा. रवींद्र आडेकर, प्रा. समीर माने, व प्रा. विवेक गंगणे उपस्थित होते.


 
Top