भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथरूड येथील प्रयोगशील व परिवर्तनवादी लेखिका प्रा.अलका सपकाळ यांच्या फुलांची शाळा या बाल साहित्यास समरसता साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण 3ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या विसाव्या समरसता साहित्य संमेलनात होणार आहे. 

संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ. अनिल गोपछडे, माणिक भोसले, डॉ.ईश्वर नंदापुरे, डॉ. प्रसन्न पाटील यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. सपकाळ यांनी विविध विषयावर लेखन केले असून महिला ,कष्टकरी, वंचित घटकांचे प्रश्न आपल्या लेखणी द्वारे मांडले आहेत. फुलांची शाळा या पुस्तकाला मिळालेला हा सातवा राज्यस्तरीय पुरस्कार असून मुलांचे भावविश्व अतिशय संवेदनशीलतेने शब्दबद्ध केले आहे. प्रा.अलका सपकाळ यांचे साहित्यिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top