भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात 30 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10:30 च्या दरम्यान घडली. पीडित वृद्ध महिला गावातीलच एका तरुणाच्या मोटरसायकलवर बसून जात होत्या. यावेळी तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन मोटरसायकलवरून खाली उतरवले आणि जवळच्या सोयाबीनच्या शेतात नेऊन त्यांच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेच्या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेने धाडस दाखवून 30 जुलै 2025 रोजी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64 (बलात्कार) आणि 351 (3) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडितेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

 
Top