भूम (प्रतिनिधी)- श्री शिवाजी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी विजय औदुंबर बोराडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीराम सुबराव खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एच सावतर व सहाय्यक निबंधक सुनीता डोकळे उपस्थित होते. मागील चार वर्षापासून शिवाजी खरेदी जरी संघाची निवडणूक झाली नव्हती .त्यामुळे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र अर्ज माघारी काढून घेतल्यामुळे ही निवडणूक 1 जुलै रोजी बिनविरोध झाली होती. दि. 23 जुलै रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मधुकर मोटे ,महादेव खैरे, तात्यासाहेब गोरे, संजय बोराडे, संजय पाटील, अशोक नलवडे, नानासाहेब पाटील, सुरेश अंबादास जाधव, विजय औदुंबर बोराडे, सुरेश भागवत भोरे, रवींद्र तुकाराम पवार, वैयक्तिक गटामधून प्रवीण दादासाहेब खटाळ, प्रकाश रामभाऊ शेळके, रमेश विश्वभर मस्कर, हिरालाल मारुती ढगे, राजेंद्रज्ञानदेव गाढवे,श्रीराम सुबराव खंडागळे, शहाजी दिगंबर दराडे ,गौरीशंकर दगडू साठे ,सतीश उत्तम सोन्ने, वर्षा अशोक नलवडे, सुधा वसंत यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.