तुळजापूर (प्रतिनिधी)- गोवा येथील राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे यांनी दर्शन दौऱ्यानिमित्त आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 

तानवडे हे सहकाऱ्यांसह महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांच्या दर्शन दौऱ्यावर आहेत. यावेळी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंदिर संस्थान प्रशासनाच्या व्यवस्थेचे यावेळी त्यांनी कौतुक केले. मंदिर संस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके यावेळी उपस्थित होते.


 
Top