भूम (प्रतिनिधी)- येथील बंडू बबन कसबे यांना राष्ट्रीय समरसता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भावना बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय समरसता पुरस्कार पुरस्कार देण्यात येतो. तो यावर्षी येथील शिक्षक बंडू बबन कसबे यांना देण्यात आला आहे. 2025 च्या पुरस्कार समितीने कसबे यांची निवड केली आहे.

बहुआयामी विविध क्षेत्रातील चळवळींशी तादाम्य साधुन आपण त्यातील एकात्मीक, सामाजिक व शैक्षणिक या समतेच्या व समरसतेच्या कार्याचे मोठे योगदान साधले आहे, सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते नाशिक क्षेत्री बहाल करण्यात येणार आहे.

 
Top