तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे गुरुवार दि 24 जुलै पासून नागनाथ महाराज यात्रेस गुरुवारी अमावस्येदिनी नागनाथ महाराज मुर्तीस रुद्र, अभिषेक, पंचआरतीसह, मानकऱ्यांच्या हस्ते मुख्यपुजारी सद्गुरु स्वामी महाराज यांना कंकण बांधून, व नाग, पाल, विंचू, यांच्या आगमनाने प्रारंभ झाला

याठिकाणी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग पाल विंचू-हे उभयचर जिव श्री नागनाथ महाराजांच्या मंदिरा समोर एका शिळेखाली अमावस्यापासुन पाच दिवस एकत्रित वास्तव्य करतात. त्या निमित्ताने नागपंचमी दिवशी सावरगाव येथे मोठी यात्रा भरते, यावेळी मोठा जनसागर नागनाथाच्या दर्शनासाठी उसळलेला असतो . मंगळवारी 29 जुलै रोजी मंदिराचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांची हनुमानच्या मंदिरापासून खर्ग संचारलेल्या अवस्थेमध्ये गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक होऊन नागनाथ देवस्थानातील भाकणूक कट्ट्यावर आल्यानंतर वर्ष भाकणूक. खरग डोहास्नान होऊन महा आरतीने यात्रेची सांगता होते. या पाच दिवस चालणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी स्वतः लक्ष देऊन  यात्रा सुरक्षितेचे नियोजन केले आहे. तर ग्रामपंचायत प्रशासन देखील यात्रेमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना राबवत आहे. 


हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

नागपंचमी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 24 जुलै रोजी अमावस्या दिनी नागनाथ महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी  राजकुमार माने, पोपटराव माळी  शंकरराव अक्कलकोटे, विनायक करंडे, हरिभाऊ फंड, नवनाथ दरेकर, हरिदास मुळे, सोमनाथ तानवडे, राम काशीद, यशवंत कुलकर्णी आदींच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था केली होती. यावेळी सावरगाव पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 



माने कुटुंबीयांकडून एक वर्षापासून मोफत पाणी व्यवस्था

दर अमावस्याला नागनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविक येत असतात. या भाविकांना ग्रामस्थ आणि अन्नदात्यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. यावेळी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील विमा प्रतिनिधी राजकुमार माने यांच्या वतीने करण्यात येत आहे.  भविष्यकाळात अविरतपणे पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

 
Top