धाराशिव (प्रतिनिधी)- राज साहेब ठाकरे आदेशानुसार पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे व सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शना खाली धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या अध्यक्षते खाली सलीमभाई औटी यांची धाराशिव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

या वेळी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोंदर कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष गोपाळ घोगरे धाराशिव शहर अध्यक्ष निलेश जाधव जिल्हा सचिव अजय तांबिले जिल्हा प्रवक्ते नागेश मोरे परंडा तालुका अध्यक्ष सुरेश पाटील वाशी तालुका अध्यक्ष अक्षय चेडे रस्ते आस्थापना रविराज घाडगे कळंब तालुका सचिव सूरज बुधवंत विध्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष सूरज बोंदर व इतर महाराष्ट्र सैनीक उपस्थित होते. राज साहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन  धाराशिव तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचे व राज साहेबांचे विचार गावागावांमध्ये पोहोचण्याचे कार्य  धाराशिव तालुका नवनिर्वाचित  तालुकाध्यक्ष सलीम भाई औटी यांनी सांगितले.


 
Top